मृत्‍यूसमयी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे कै. मोहन चतुर्भुज यांच्‍या पहिल्‍या वर्षश्राद्धाच्‍या वेळी त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१९.४.२०२२ या दिवशी कै. मोहन चतुर्भुज यांचे प्रथम वर्षश्राद्ध होते. त्‍या वेळी त्‍यांची पत्नी आणि त्‍यांची मुलगी यांना आलेल्‍या अनुभूती आणि सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. मोहन चतुर्भुज

१. श्रीमती माधवी चतुर्भुज (पत्नी), पुणे

श्रीमती माधवी चतुर्भुज

अ. ‘१९.४.२०२२ या दिवशी यजमानांचे वर्षश्राद्ध होते. तेव्‍हा त्‍यासाठी लागणारी सिद्धता करतांना ‘काहीतरी आनंद सोहळा साजरा करणार आहोत’, असेच मला वाटत होते, तसेच आनंद आणि उत्‍साह जाणवत होता.

आ. त्‍यांच्‍या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत होता. छायाचित्राकडे पाहून भाव जागृत होत होता. ‘छायाचित्रातून आनंदाच्‍या लहरी आणि चैतन्‍य पसरत आहे’, असे मला जाणवले.

इ. वर्षश्राद्धासाठी जमलेल्‍या सर्व नातेवाइकांना छायाचित्रामध्‍ये वेगळेपणा जाणवत होता. आलेले सर्व जण म्‍हणाले, ‘‘विधी अतिशय चांगले झाले.’’

ई. कै. चतुर्भुज यांच्‍या यज्ञस्‍थळी ठेवलेल्‍या छायाचित्रात ते आनंदी आणि चैतन्‍यमय जाणवत होते.

उ. ‘त्‍यांची साधना गतीने चालू आहे आणि ते पुष्‍कळ आनंदी आहेत’, असे मला जाणवले.

ऊ. मी एक वेगळाच आनंद सोहळा अनुभवला.’

२. कु. मधुरा चतुर्भुज (मुलगी), पुणे

कु. मधुरा चतुर्भुज

अ. ‘मंत्रोच्‍चार चालू झाल्‍यावर वातावरणात पांढरा आणि पिवळा प्रकाश पसरतांना दिसला.

आ. वडिलांचा (कै. मोहन चतुर्भुज यांचा) चेहरा स्‍मितहास्‍य करतांना दिसत होता आणि वातावरणात आनंदाच्‍या लहरी जाणवत होत्‍या.

इ. पुरोहित मंत्रोच्‍चार करत असतांना सूक्ष्मातून ‘श्रीकृष्‍ण, हनुमान आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले उपस्‍थित होते’, असे मला जाणवले.

ई. वातावरणातील नकारात्‍मक ऊर्जा अल्‍प होऊन सकारात्‍मक ऊर्जा वाढत होती.

उ. कार्यक्रम चालू असतांना सूक्ष्मातून स्‍वर्गातील देवता आणि महर्लोकात वास्‍तव्‍यास असलेले ऋषिमुनी दिसले.

. वातावरणात त्रासदायक लहरी दिसत होत्‍या; पण मंत्रोच्‍चार वाढल्‍यावर वातावरणात चैतन्‍य जाणवले आणि ते वाढतच होते.

ए. ‘प.पू. भक्‍तराज महाराज यांचे दर्शन होऊन ते सूक्ष्मातून उपस्‍थित आहेत’, असे मला दिसले.

ऐ. ‘आरंभी हा श्राद्धाचा कार्यक्रम आहे’, असे मला वाटले नाही. देवतांच्‍या उपस्‍थितीत एक वेगळाच सोहळा जाणवला आणि ‘बाबा पुष्‍कळ आनंदात आहेत’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सूक्ष्मातून सांगितले. तेव्‍हा माझा भाव जागृत होत होता. गुरुदेवांच्‍या स्‍मरणाने मला स्‍थिर रहाता आले.

या अनुभूती आल्‍याबद्दल श्री गुरुचरणी कृतज्ञता !’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १९.४.२०२२)


या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.