जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जिहादी आतंकवाद्याकडून हिंदु बंदीवानाला अमानुष मारहाण

  • हिंदु बंदीवानावर मुसलमान होण्यासाठी टाकला जात होता दबाव !

  • कारागृहात वाटली जात आहेत हिंदुविरोधी पुस्तके !

जोधपूर (राजस्थान) – येथील मध्यवर्ती कारागृहामधील बंदीवान सुभाष विश्नोई याने आरोप केला आहे की, त्याच्यावर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. कारागृहामध्ये हिंदुविरोधी पुस्तके वाटण्यात येत आहेत. या प्रकरणी सुभाष यांनी वकार आणि अशरफ यांच्यासहित ६ लोकांवर आरोप केला आहे. त्यांनी सुभाष याच्यावर आक्रमण केल्याचे त्याने सांगितले. मारहाण करणारे हे आरोपी जिहादी आतंकवादी आहेत.

दीड मासांपूर्वी वकार आणि अशरफ यांनी सुभाषवर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकल्याने तो मानसिक तणावात होता. याच वेळी या दोघांनी अन्य काही जणांसमवेत मिळून सुभाषवर आक्रमण केले. यात तो गंभीररित्या घायाळ झाला. त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे अशा प्रकारच्या घटना घडणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही !