वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल ! – सद्गुरु स्वाती खाडये

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन

कुडाळ, २९ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण ताठ मानेने जगतो आहोत; म्हणून तो इतिहास विसरून चालणार नाही. बहुसंख्येने असलेल्या हिंदूंच्या भारतात सनातन हिंदु धर्माचा आदर करून कायदे बनवले गेले पाहिजेत. सेक्युलर व्यवस्थेला पर्याय म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल. हे करण्यासाठी शिवाजी महाराजांप्रमाणे साधनाही केली पाहिजे. वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. या सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.

सभेच्या प्रारंभी शंखनाद, त्यानंतर सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. आनंद मोंडकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी करून दिली.

सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘सनातन हिंदु धर्म हा हिंदु राष्ट्राचा प्राण आहे. अनादि काळापासून सनातन हिंदु धर्मातील सिद्धांतानुसारच भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज देशात निधर्मीपणाचा (‘सेक्युलर’पणाचा) गवगवा होत आहे; पण या ‘सेक्युलर व्यवस्थेमुळे हिंदु पिढी उद्ध्वस्त होत आहे. धर्म विसरल्यामुळे विविध प्रकारच्या जिहादांना हिंदू बळी पडत आहेत. हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आज चित्रपटांतून हिंदूंच्या देवीदेवतांची विटंबना केली जाते. हे करतांना त्यांना भीती वाटत नाही; कारण त्यांना माहिती आहे की, हिंदू स्वतःचे कुटुंब, स्वतःचा व्यवसाय यात गुरफटलेले आहेत. त्यांच्यामध्ये धर्माभिमान राहिलेला नाही. ही स्थिती आपल्याला पालटायची आहे; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी आवाज बुलंद करायचा आहे. अशा सभांच्या माध्यमातून हिंदूंना जागृत करायचे आहे.’’

संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार

मुळदे, कुडाळ येथील प.पू. घडशी महाराज यांचा सन्मान देवगड येथील सनातनचे साधक श्री. भास्कर खाडीलकर यांनी केला.

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान कुडाळ येथील श्री. वासुदेव सडवेलकर यांनी, तसेच सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान कुडाळ येथील धर्मप्रेमी सौ. अश्वीनी गावडे यांनी केला.

श्री. मनोज खाडये यांचा सत्कार तेर्सेबांबर्डे गावचे सरपंच श्री. रामचंद्र परब यांनी केला. श्री. नीलेश सांगोलकर यांचा सत्कार तेर्सेबांबर्डे येथील धर्मप्रेमी श्री. रूपेश कानडे यांनी केला.

कुडाळ (सिंधुदुर्ग) सभेत मान्यवरांनी व्यक्त केलेले उद्बोधक विचार !

लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद आदी देशविरोधी कृत्यांच्या विरोधात सिंधुदुर्गात महाआंदोलन उभारणार ! – श्री. मनोज खाडये

श्री. मनोज खाडये

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ख्रिस्ती मिशनरींकडून धर्मांतराचे केंद्र बनवले जात आहे. लव्ह जिहाद, पाकिस्तानशी संबंधित संघटनांचे कार्य, हलाल प्रमाणपत्र अशा देशविरोधी कृत्यांच्या विरोधात जिल्ह्यात येत्या आठवड्याभरात महाआंदोलन उभे केले जाणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद, लँड जिहाद पोचला आहे. देवगड, वेंगुर्ले, मालवण येथील समुद्रकिनारपट्टीवर महसूलच्या नोंदी तपासल्या, तर आपणास (लँड जिहादच्या माध्यमातून) घेरले जात असल्याचे लक्षात येईल. हिंदूंनी सजग झाले पाहिजे. हिंदूंवरील अन्याय, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात राज्यातील १७ जिल्ह्यांत जनआक्रोश मोर्चे काढले गेले. लाखोंच्या संख्येने हिंदु एकत्र आले. ही सभा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला समर्थन देणारी आहे. आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करावा लागणार. वर्ष २०२५ मध्ये केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राची पायाभरणी केली जाणार आहे.

सभेचे फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण !

बांदा येथे मोठी स्क्रीन (पडदा) लावून फेसबुकच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र- जागृती सभेचे थेट प्रक्षेपण केले जात होते. याविषयी श्री. मनोज खाडये सभेत म्हणाले, ‘‘आता क्रिकेट नाही, तर हिंदु राष्ट्र जागृती सभा स्क्रीनवर पाहिल्या जात आहेत, हा हिंदूंमध्ये होत असलेला चांगला पालट आहे.’’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी आतंकवादी संघटनेचा तपास करा ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

प्रभु श्रीरामचंद्रांच्या हिंदु राज्याची, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची आम्ही मागणी करत आहोत. आताच्या वेळकाढू न्याययंत्रणेनुसार नव्हे, तर छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासारखी न्याययंत्रणा हिंदु राष्ट्रात असेल. ‘देशात सर्वधर्मसमभाव आहे’, असे म्हटले जाते, तर मग संपूर्ण भारतात आज केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का केले जाते ? ख्रिस्त्यांसाठी डायोसेसन संस्था आणि मुसलमानांसाठी वक्फ बोर्ड आहे, तर मग कायदे फक्त हिंदूंसाठीच आहेत का ? सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण झाले. मग मंदिर सरकारीकरणातून कसा भ्रष्टाचार होतो ? हे हिंदु विधीज्ञ परिषदेने अनेक घोटाळ्यांद्वारे उघड केले. मंदिरांची अनेक एकर भूमी परत मिळवून दिली आहे.

कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर का कारवाई होत नाही ? राजस्थानमधील कन्हैयालालच्या हत्येच्या कटात ‘दावत ए इस्लामी’ या संघटनेचा हात आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने तिच्या अन्वेषण अहवालात म्हटले आहे. ‘दावत ए इस्लामी’ या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.

सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणार्‍यांचे आभार !

१. कुडाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांनी पटांगण, तसेच छोटे सभागृह उपलब्ध करून दिले.

२. मालवण येथील हिंदमाता डेकोरेटर्सचे मालक श्री. अभिमन्यू पांचाळ यांनी व्यासपीठ उभारणी, बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, ध्वनीव्यवस्था यांसह अन्य साहित्य उपलब्ध करून दिले.

३. सभेच्या सिद्धतेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था श्री. हेमंत शिरसाट, सौ. पद्मा दामले, श्री. मंजुनाथ फडके, श्री. महेंद्र गवस यांनी केली.

४. महाप्रसाद वितरण करण्यासाठी लागणारे साहित्य कुडाळ येथील व्यापारी श्री. शेखर काळप यांनी उपलब्ध करून दिले.

५. सिद्धीविनायक मंगल कार्यालयाचे मालक श्री. अरुण पेडणेकर यांनी टेबल आणि खुर्च्या देऊन सहकार्य केले.

६. वेतोबा इलेक्ट्रिकलचे मालक श्री. नितीन सामंत यांनी विद्युत जनित्र उपलब्ध करून दिले.

७. मालवण येथील अधिवक्त्यांनी सभा संपन्न होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

यांसह कुडाळ पोलीस ठाणे प्रशासन, कुडाळ नगरपंचायत, तसेच विविध माध्यमांचे पत्रकार यांनी सभा यशस्वी होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल या वेळी आभार मानण्यात आले.


पहा –

हिंदु जनजागृती समिती आयोजित
हिंदु राष्ट्र-जागृती सभा, कुडाळ, दि. २९ जानेवारी २०२३

सभा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
facebook.com/jagohindusindhudurg/videos/6135152263172322 

अवश्य पहा आणि इतरांनाही पाठवूया 🙏


फेसबुक लाईव्हद्वारे १ सहस्र ३०० लोकांनी सभेचा लाभ घेतला.

राष्ट्रप्रेमींचा सत्कार

कसाल येथील श्री. चंद्रकांत राणे, गोवेरी येथील श्री. सच्चिदानंद विठ्ठल माधव या राष्ट्रप्रेमींचा सत्कार मनोज खाडये यांनी केला. दोन्ही राष्ट्रप्रेमींनी गेले २० दिवस व्यापक प्रसार केला.

अन्य क्षणचित्रे

१. वेदमूर्ती श्री. आशुतोष बडवे आणि श्री. प्रथमेश साधले यांनी वेदमंत्रपठण केले.

२. महिला पोलिसांनी सभेचे चित्रीकरण केले.

३. सभास्थळी सभा चालू होण्याआधीपासून गरुड फिरत होते.

४. बांदा येथील स्वयंभू एंटरप्राइजेस या दुकानात कुडाळ सभेचे टी.व्ही. वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.

उपस्थित मान्यवर

१. भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. भाई सावंत

२. श्री. प्रकाश नारकर – कोकण इतिहास परिषदेचे जिल्हाध्यक्ष, गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष, तसेच ‘मूर्तीशास्त्र’ औरंगाबाद विभागाचे समन्वयक आहेत. (समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग असतो.)

३. पिंगुळी गावचे सरपंच श्री. अजय आरेकर

४. तेर्सेबांबर्डे गावचे सरपंच श्री. रामचंद्र परब

५. कुडाळ पंचायत समिती सदस्य सौ. सुप्रिया वालावलकर

६. कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती श्री. संजय वेंगुर्लेकर

७. आंदुर्ले गावचे सरपंच श्री. अजय तेंडुलकर

८. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते

९. कसाल येथील प्रतिष्ठीत व्यापारी श्री. अवधूत मालणकर

१०. भाजपच्या महिला आघाडी प्रमुख सौ. संध्या तेरसे

बालकक्षाद्वारे लहान मुलांकडून भारतीय संस्कृतीविषयी प्रबोधन

बालकक्षाद्वारे भारतीय संस्कृतीविषयी प्रबोधन

बालकक्षामध्ये कु. भाग्येश कोपदार याने ‘नेताजी सुभाष चंद्रबोस’, कु. भक्ती टोपकर यांनी ‘राजमाता जिजाबाई’, कु. राधिका पाटील हिने ‘रणरागिणी झाशीची राणी’, कु. कृष्णाली बागवडे हिने ‘कित्तूरची राणी चन्नम्मा’ आणि कु. पार्थ सामंत याने ‘बालवीर शिरीषकुमार’, कु. सान्वी राकेश म्हाडदळकर हिने चितौडची राणी पद्मिनी आणि कु. स्वरुप चिऊलकर याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या व्यक्तिरेखा साकारून, तसेच अन्य मुलांनी राष्ट्र अन् धर्म यांविषयी प्रबोधन करणारे फलक हाती घेऊन सहभाग घेतला होता.

क्षणचित्रे

१. मुळदे, कुडाळ येथील प.पू. घडशी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

२. पानवळ, बांदा येथील संत प.पू. दास महाराज यांनी सभेसाठी पाठवलेल्या संदेशाचे श्री. आनंद मोंडकर यांनी वाचन केले.

३. श्री. मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

बैठकांचे आयोजन

१. श्री सिद्धीविनायक मंदिर, कसाल येथे ३१ जानेवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता
२. वरचीदेवली, मालवण येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे गुरुवार, २ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता