काशीमीरा (जिल्‍हा ठाणे) भागात अमली पदार्थाच्‍या विक्रीसाठी आलेल्‍या धर्मांधास अटक !

ठाणे, २७ जानेवारी (वार्ता.) – काशीमीरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील काशीमीरा महामार्गावरील श्री सगणाईदेवी मंदिराच्‍या परिसरात मॅफेड्रॉन (एम्.डी.) हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्‍या फहीम करीम खान याला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून १९ लाख ६० सहस्र रुपये किमतीचा ९८ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एम्.डी.) हा अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आलेे. (कठोर शिक्षा होत नसल्‍यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही. – संपादक) या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

गुन्‍हेगारीमध्‍ये नेहमीच धर्मांध पुढे असणे देशासाठी धोक्‍याचे आहे, यासाठी त्‍यांना कठोर शिक्षा आवश्‍यक !