बहिणीला साधनेत साहाय्‍य करणारे आणि तिची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेणारे श्री. आकाश श्रीराम !

श्री. आकाश श्रीराम

 १. साधिकेच्‍या भावाने तिची लहानपणापासून काळजी घेणे

‘माझा भाऊ (श्री. आकाश श्रीराम) माझ्‍याहून ५ वर्षांनी मोठा आहे. दादा लहानपणापासून माझी फार काळजी घेतो. तो माझ्‍यावर फार प्रेम करतो. आमची घरची परिस्‍थिती बेताची असल्‍याने दादा काही वर्षांपासून एका ठिकाणी कामाला जात असे. दादावर घराचे आणि माझ्‍या शिक्षणाचे दायित्‍व होते.

२. साधिकेच्‍या भावाने तिला साधना सांगून सत्‍संगाला नेणे

दादा हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या माध्‍यमातून साधनेत आला. तेव्‍हा दादा कामाला जाऊन साधना आणि नोकरी करत होता. तो मला साधना सांगून सत्‍संगाला घेऊन जात असे. मार्च २०२२ मध्‍ये आम्‍ही रामनाथी आश्रमात साधना करण्‍यासाठी आलो. आश्रमात आल्‍यानंतर आम्‍ही काही दिवस स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत होतो.

३. साधिकेच्‍या भावाने तिची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेणे

२४.६.२०२२ या दिवशी माझ्‍या हाताचा अपघात झाला. माझे शस्‍त्रकर्म झाल्‍यावर दुसर्‍या दिवशी मला फार वेदना होत होत्‍या. तेव्‍हा दादा रात्रभर न झोपता रुग्‍णालयात माझ्‍या जवळच होता. मी रुग्‍णालयात बरेच दिवस होते. तेव्‍हा दादाने माझी आई-वडिलांप्रमाणे काळजी घेतली. मला जेवण जात नव्‍हते. तेव्‍हा तो मला जेवण भरवत असे. दादा मला ‘‘तू एका हाताने सर्व कामे करू शकतेस’’, असे सांगून प्रेरणा देत होता. तो मला ‘कामे कशी करायची ?’, हे शिकवत होता.

गुरुदेवांच्‍या अपार कृपेमुळे मला श्रीकृष्‍णासारखा भाऊ मिळाला. गुरुदेव मला दादाच्‍या माध्‍यमातून साधनेत घेऊन आले आणि माझ्‍यावर कृपा करत आहेत. त्‍याबद्दल मी गुरुदेवांच्‍या चरणी आणि दादा प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. सुवर्णा श्रीराम (श्री. आकाश श्रीराम यांची बहीण, वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०२२)

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत केवळ कृतज्ञता अन् कृतज्ञताच ।

कु. सुवर्णा श्रीराम

प.पू. माऊली (टीप १), तुम्‍ही माझ्‍यासाठी किती केले ।
घेऊनी आलात भू-वैकुंठात, आपल्‍या कृपाछत्राखाली ॥ १ ॥

काहीच कळत नाही, या अज्ञानी जिवाला ।
भरभरून दिले चैतन्‍य अन् शक्‍ती मला ॥ २ ॥

साधनेचे प्रयत्न करून घेतले, दिले आध्‍यात्मिक बळ ।
हे गुरुनाथा (टीप २), नष्‍ट केले माझे घोर प्रारब्‍ध ॥ ३ ॥

सूक्ष्मातूनी तुम्‍ही दिले मला प्रारब्‍ध भोगण्‍याचे बळ ।
म्‍हणून सहन करू शकले मी वेदना ॥ ४ ॥

माझ्‍यासारख्‍या जिवावर करूनी आपली प्रीतीमय कृपा ।
तव चरण सेवा करण्‍यास दिले जीवनदान पुन्‍हा ॥ ५ ॥

माझी काहीच पात्रता नसतांनाही,
तुम्‍ही केला कृपावर्षाव ।
प्रीतीस्‍वरूप गुरुदेवांसाठी मी काहीच करू शकत नाही ॥ ६ ॥

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत केवळ कृतज्ञता अन् कृतज्ञताच ।
व्‍यक्‍त करता यावी माऊली ॥ ७ ॥

१. टीप १ आणि २ : परात्‍पर गुरु डॉ. आठवले

– श्री गुरूंची,
– कु. सुवर्णा श्रीराम , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७ .११ .२०२२)