म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठी मान्‍यवरांना निमंत्रण !

मिरज (जिल्‍हा सांगली) – २२ जानेवारीला म्‍हैसाळ (मिरज तालुका) येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात येत आहे.

म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथील सरपंच सौ. रश्‍मी आबासाहेब शिंदे (उजवीकडे) यांना ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देतांना श्री. संजय घाटगे आणि श्री. किरण कुलकर्णी
म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी (उजवीकडे) यांना निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई

श्री शिवप्रतिष्‍ठान प्रतिष्‍ठानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना भेटून सभेचे निमंत्रण देण्‍यात आले. म्‍हैसाळ येथील सरपंच सौ. रश्‍मी शिंदे यांनाही भेटून निमंत्रण देण्‍यात आले. त्‍यांना ‘हिंदु राष्‍ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा सनातनचा ग्रंथ भेट देण्‍यात आला.