चेन्नई (तमिळनाडू) – पाकपुरस्कृत आतंकवाद आणि चीनसमवेतचा सीमेवरील संघर्ष यांना भारताने जोदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत कुणाच्याही दबावाखाली आलेला नाही. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची पावले उचलेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. ते येथील तमिळ साप्ताहिक ‘तुघलक’च्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ‘पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून आपल्या वायूदलाने पाकमधील बालाकोटमध्ये जाऊन कारवाई करून योग्य तो संदेश दिला होता’, याचीही आठवण त्यांनी या वेळी करून दिली.
Jaishankar: जयशंकर ने चीन-पाक को दिया सख्त संदेश, कहा- कोरोना के बावजूद हमारी जवाबी प्रतिक्रिया मजबूत और दृढ़#Jaishankar #indiachinastandoffhttps://t.co/OLZyoDYuZh
— Amar Ujala (@AmarUjalaNews) January 15, 2023
जयशंकर पुढे म्हणाले की, चीन उत्तरेतील सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करून आमच्या सीमेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आम्ही योग्य प्रत्युत्तर दिले होते. सीमेवर सहस्रोंच्या संख्येने आपले सैनिक संरक्षणासाठी तत्पर आहेत.
जर वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली नसती, तर चीन नाही, तर भारत जगातील सर्वांत मोठा देश असता, असे विधान परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या वेळी केले. |