-
शिल्पांच्या ठिकाणी अस्वच्छता
-
शिल्पासमोर अडगळीचे सामान ठेवले
-
चौकटींना कीड लागली

नवी मुंबई, १३ जानेवारी (वार्ता.) – वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरवस्था झाली असून शिवचरित्र शिल्पांच्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. (शिवप्रेमींनो, केवळ संतप्त होऊ नका, तर ही दुरवस्था पालटण्यासाठी कृतीशील व्हा ! – संपादक)
१. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नवी मुंबईतील महत्त्वाचे ठिकाण आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून चौकाचे सुशोभीकरण केले. या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.
२. वाशी डेपोलगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राची माहितीपर शिल्प साकारण्यात आली आहेत. याच ठिकाणी ६ डोम असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध ६ चित्रांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. सध्या त्यातील चारच फ्लेक्स उरले असून उन्हामुळे त्यांचाही रंग फिकट झाला आहे.
३. संपूर्ण चौकावर विद्युत् विभागाने आकर्षक रोषणाई केली होती; पण तीही आता बंद आहे. हॅलोजन तुटून ठिकठिकाणी लोंबकळत आहेत.
४. शिल्पांना कुणी हात लावून ते खराब होऊ नयेत, यासाठी शिल्पासमोर २ फूट जागा सोडून संरक्षक काच लावली आहे; पण या २ फुटांच्या जागेत अडगळीचे सामान ठेवण्यात आले आहे.
५. शिल्पांच्या चौकटींना कीड लागली आहे. समोरील काचेवर प्रचंड धूळ असते. सफाई कामगारांकडून तेथील गवताची स्वच्छता केली जात नाही. अश्वारूढ पुतळ्याच्या चौथर्यावर गवत उगवले आहे. चौथर्याच्या पायासमोरील पेव्हर ब्लॉक खराब झाले असून येथे कचरा पडलेला असतो.
६. शिल्प आणि अश्वारूढ पुतळा यांच्या सुरक्षेसाठी २४ घंटे सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत; मात्र चौकाच्या परिसरात भटके कुत्रे झोपलेले असले, तरी सुरक्षारक्षक त्यांना हटकतांना दिसत नाहीत. अनेकदा ते भ्रमणभाषमध्ये गुंग असतात.
७. प्रदर्शन कट्टा असणार्या ठिकाणचे स्टीलचे रेलिंग तुटले आहे. राजकीय आणि सामाजिक उपक्रम झाल्यावर संबंधितांकडूनच या परिसरात कचरा करणे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकणे असेही प्रकार घडतात.
हे सर्व प्रकार थांबवायला हवेत, असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबईचे प्रमुख भरत माळी यांनी मांडले. कार्यकारी अभियंता सुनील लाड यांनी ‘या ठिकाणच्या विद्युत्विषयीच्या कामांची नोंद घेऊन लवकरच दुरुस्ती करण्यात येईल’, असे सांगितले.
संपादकीय भुमिका
|
काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये मध्यरात्री हटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा !
Dhaka Hindu Protest : हिंदूंनी ढाक्यामध्ये काढला विशाल मशाल मोर्चा !
(म्हणे) ‘हिंदूंना विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल !’ – Maulana Sajjad Nomani
छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी !
‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या चौकशीची मागणी !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती