हजारीबाग (झारखंड) येथे शस्त्रांचा धाक दाखवून बलपूर्वक गोमांस खाण्यास लावणार्‍या मुसलमानांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

हजारीबाग (झारखंड) – येथील बरियठ बिरहोर टोला भागात ५० हून अधिक आदिवासी लोकांना शस्त्रांचा धाक दाखवून गोमांस खाण्यास बाध्य करण्यात आले. त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्नही केला गेला. या प्रकरणी मनोज बिरहोर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

१. या तक्रारीत म्हटले आहे की, ३० डिसेंबर या दिवशी या भागात खलील मियाँ नावाची व्यक्ती तिच्या मित्रासह पोचली होती. येथे ३१ डिसेंबरच्या रात्री देण्यात आलेल्या मेजवानीच्या वेळी काही लोकांना दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्यांना जेवण देण्यात आले. हे मांसाहार जेवण पाहून त्यांना गोमांस असल्याची शंका आली. त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून मांस खाण्यास भाग पाडण्यात आले.

२. साहिबगंजच्या राधानगर भागातही ३१ डिसेंबरच्या रात्री चंदन रविदास नावाच्या व्यक्तीला बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर मिठुन शेख, नसीम शेख, फिरोज शेख यांच्या समवेत ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपने या दोन्ही घटनांवरून झारखंड सरकारवर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

शस्त्रांचा धाक दाखवून हिंदूंना बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्याचे धाडस होतेच कसे ? हे रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक !