सीरियातील लाखो स्थलांतरित मुसलमानांना परत पाठवा !

नेदरलँड्सच्या खासदाराचा घणाघात

गीर्ट विल्डर्स

ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्सच्या सीमांवर सरकारने पुन्हा एकदा नियंत्रण मिळवायला हवे. आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय सीमा नियंत्रण कायदा लागू करणे आवश्यक आहे. आपल्याकडे लाखो स्थलांतरित आहेत. सीरियातील स्थलांतरित मुसलमान ‘आम्ही शरणार्थी आहोत, आम्हाला आश्रय द्या’, असा खोटा दावा करत आले आहेत. त्यांना जर्मनी आणि बेल्जियम येथे परत पाठवायला हवे. आता पुष्कळ झाले, असा घणाघात नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष तथा खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ‘टीव्ही ७ इस्रायल न्यूज’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात केला.

( सौजन्य : TV7 Israel News )

गेल्या ७-८ वर्षांपासून सीरिया, उत्तर आफ्रिका, तसेच अफगाणिस्तान येथून लाखो मुसलमान युरोपमध्ये आश्रय घेण्यासाठी येत आहेत. ते युरोपातील संस्कृती भ्रष्ट करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक देशांतून त्यांना विरोध केला जात आहे. यासंदर्भात विल्डर्स पुढे म्हणाले की, आपल्या देशात प्रतिवर्षी ५० सहस्र लोक आश्रय घेत आहेत. हे आपल्याला परवडण्यासारखे नाही. आता त्यांना परत पाठवण्याची वेळ आली आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताने कोट्यवधी बांगलादेशी घुसखोर आणि लाखो रोहिंग्या मुसलमान यांना आश्रय दिला आहे. यांच्यापैकी अनेक जण आतंकवादी कारवाया, तसेच अन्य अवैध कृत्ये करत असल्याचे समोर आले आहे. तरी त्यांच्या विरोधात निर्णायक कृती करण्यासाठी कोणताही भारतीय राजकारणी आवाज उठवत नाही, हे सर्वपक्षियांना लज्जास्पद !
  • मुसलमानांनी घुसखोरी करणे, ही जागतिक समस्या असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी मुसलमानेतर देशांनी एकत्र यावे !