म्हापसा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेला पालट
१. श्री. प्रकाश नाईक, फोंडा, गोवा.
अ. ‘सौ. मीनाक्षीताई साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना साधकांना ‘मनाच्या स्तरावर कोणत्या प्रतिक्रिया आल्या ?’, याचे चिंतन करायला सांगतात. आमचा सर्वांचा आढावा ऐकल्यावर नेमकेपणाने ‘आम्ही कुठे न्यून पडतो ?’, हे त्या सांगतात. त्यामुळे आम्हाला व्यष्टी साधना करायला उत्साह येतो.
१ आ. ताईंचा ईश्वराप्रतीचा भाव वाढला आहे.’
२. श्री. रमेश दत्ता फडते, फोंडा, गोवा.
अ. ‘सौ. मीनाक्षीताई वेळोवेळी सेवेविषयीची सूत्रे भावाच्या स्तरावर सांगत असल्याचे मला जाणवले.
आ. आता ताई सत्संग घेण्यापूर्वीच सत्संगात सहभागी झालेल्या साधकांना ‘सूत्रे काढली आहेत का ?’, असे विचारतात आणि त्यात काही पालट करायचे असल्यास लगेच सुचवतात. त्यामुळे मागील २ मासांतील सत्संगांत आधी पाठवलेल्या सूत्रांची समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न माझ्याकडून ईश्वरी कृपेने आणि ताईंच्या प्रेरणेने झाला. असे पहिल्यांदाच झाले. पूर्वी मी सत्संगात सहभागी होत नसे.’
– सर्व सूत्रांचा दिनांक (२४.७.२०२१)