हिंदु महिलेसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये रहाणार्‍या शाहरूख याने तिच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार !

(‘लिव्ह-इन रिलेशनशीप’ म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

आरोपी शाहरूख आणि त्याचा भाऊ साहिल

इंदूर – हिंदु महिलेसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये रहाणार्‍या शाहरूख याने तिच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या लैंगिक अत्याचारात आरोपी शाहरूख आणि त्याचा भाऊ साहिल सहभागी असल्याचा आरोप अल्पवयीन हिंदु मुलीने केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.


१. संबंधित हिंदु महिला तिच्या २ मुलींसह वर्ष २००८ पासून तिच्या पतीपासून वेगळी रहात होती. २ वर्षांपूर्वी शाहरूख या महिलेच्या संपर्कात आला. नंतर ती महिला तिच्या २ मुलींसह शाहरूखसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहू लागली.

२. मोठ्या मुलीचे वय १४ वर्षे आहे. एके दिवशी तिची धाकटी बहीण बाहेर घरी गेली असतांना शाहरूखने तिला एकटी पाहून तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. यानंतरही वासनांध शाहरूख याने त्या अल्पवयीन हिंदु मुलीवर लैंगिक अत्याचार चालूच ठेवले.

३. काही दिवसांनी शाहरूख याचा भाऊ साहिल यानेही पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीने त्याच्या कृत्याला विरोध केल्यावर तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

४. पीडित मुलगी १७ डिसेंबर २०२२ या दिवशी आजीकडे पळून गेली. तिने आजीला शाहरूख आणि साहिल यांची सर्व कृत्ये सांगितली. तिच्या आईने इस्लाम पंथ स्वीकारला होता. अल्पवयीन मुलीची व्यथा ऐकून तिच्या आजीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

धर्मांधांवर प्रेम करणे; म्हणजे स्वतःसमवेत स्वतःच्या कुटुंबियांचे आयुष्यही उद्ध्वस्त करणे, हे हिंदु महिलांच्या लक्षात येईल, तो सुदिन !