‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ६ वी, ७ वी, ११ वी आणि १२ वी यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश

नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता ६ वी आणि ७ वीतील पाठ्यपुस्तकांमध्ये गीतेचा संदर्भ अन् इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांमध्ये त्यातील श्‍लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देतांना याची माहिती दिली.