हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्‍या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

नवी देहली – देशातील ५ लाख शाळांमध्ये ‘भगवान शंकर, विष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण या देवता पूजा करण्याच्या योग्यतेच्या नाहीत. जो मूर्तीपूजा करील, तो स्वर्गात नाही, तर नरकात जाईल’, अशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे.

द्वेष शिकवणार्‍या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे, असे ट्वीट भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी सरकारने हिंदूंना वस्तूस्थिती सांगितली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !