भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाच्या तेलुगु आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम तेलंगाणा पोलिसांनी अनुमती नाकारल्याने रहित करण्यात आला. पोलिसांनी सभागृहाच्या प्रमुखांवर दबाव आणल्यामुळे सभागृहाची अनुमती रहित करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला तेलंगाणाचे माजी पोलीस महासंचालक आणि राज्याचे रस्ते सुरक्षा अन् प्राधिकरण यांचे अध्यक्ष टी. कृष्णा, तसेच आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्य सचिव एल्.व्ही. सुब्रह्मण्यम् प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार होते. हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाच्या आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांतील आवृत्तीच्या प्रकाशनाचे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले आहेत. नवी देहली येथेही प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमांमुळे कायदा-सुव्यवस्थेला कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण झालेला नाही, तसेच कुणीही कार्यक्रमावर अथवा पुस्तकावर आक्षेप घेतलेला नाही. असे असतांना पोलीस आणि प्रशासन यांची ही कृती निषेधार्ह आहे.
सरकारपुरस्कृत ‘हलाल’चा प्रसार !
ग्रंथावर ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ?’ असे स्पष्टपणे नमूद केले असतांना तेलंगाणा सरकारला भारतीय अर्थव्यवस्था आपली वाटत नाही का ? हलाल अर्थव्यवस्थेला भारतीय आस्थापने बळी पडून ‘हलाल प्रमाणपत्र’ त्यांच्या उत्पादनांसाठी स्वीकारत आहेत. हलाल प्रमाणपत्र प्राप्त करण्याची रक्कम सहस्रोंच्या घरात आहे आणि ही प्रमाणपत्रे देणार्या इस्लामी संघटनांमध्ये ‘जमात-इ-उलेमा-ए हिंद’चा समावेश आहे. ही संघटना आतंकवादाचा आरोप असणार्या ७०० हून अधिक जिहाद्यांना कायदेशीर साहाय्य करत आहे; म्हणजेच हिंदूंनी दिलेल्या रकमेचा काही भाग हा हिंदूंविरुद्ध लढणार्या आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. हा एकप्रकारे मोगलांच्या काळात हिंदूंवर लादलेल्या ‘जिझिया करा’चा हा प्रकार आहे. हलाल अर्थव्यवस्था ही थोडीथोडकी नव्हे, तर ३ ट्रिलियन अमेरिकी डॉलर एवढी अवाढव्य असतांना, हा पैसा कसा उभा रहात आहे ? याची सर्वसामान्य हिंदूंना कल्पना द्यायला नको का ? तसेच ‘बहुसंख्य हिंदूंच्या देशात हलाल शिक्का असलेली उत्पादने हिंदूंच्या गळी का उतरवण्यात येत आहेत ?’, याचे कारणही जनतेला कळायला नको का ? याचे उत्तर तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती सरकारने द्यायला हवे. केवळ जनप्रबोधनाच्या कार्यक्रमाने कायदा-सुव्यवस्था बिघडणार असेल, तर हलाल उत्पादनांना पाठिंबा देणारा ‘हलाल एक्स्पो’ हा १५ सहस्र लोक सहभागी झालेला कार्यक्रम तेलंगाणा सरकारने वर्ष २०२० मध्ये कसा आयोजित केला होता ? ‘सरकारच ‘हलाल’चा प्रसार करत आहे’, ‘हिंदूंनी हलाल उत्पादने घेण्यासाठी सरकारचेच छुपे समर्थन आहे’, असे समजायचे का ? या प्रश्नांची उत्तरे तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली पाहिजेत. हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करणारा हास्यकलाकार मुन्नवर फारूखी याचा कार्यक्रम बेंगळुरू येथे हिंदूंच्या विरोधामुळे रहित झाल्यावर तेलंगाणा सरकारने तो हिंदूंच्या भावना पायदळी तुडवत पोलीस संरक्षणात घेण्याची सिद्धता केली. ही धर्मनिरपेक्षता आहे का ? यातून कायदा-सुव्यवस्था अबाधित रहाणार का ? थोडक्यात तेलंगाणामध्ये फारूखी याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानाविषयी अवगत करणार्या पुस्तकाचे प्रकाशन करणार्या राष्ट्रप्रेमींना मात्र कसलेच स्वातंत्र्य नाही. ज्या राज्यात हिंदूंच्या अधिकारांचे हनन केले जाते, तेथे लोकशाही नाही, तर निझामशाहीच अस्तित्वात आहे, हे लक्षात येते.
कायदा-सुव्यवस्था बिघडवणारे !
तेलंगाणामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मुसलमानांना पुष्कळ सवलती देण्याची आश्वासने राव यांनी दिली होती. त्यामध्ये ‘शादी मुबारक वित्तीय योजना’, ‘रमझान भेट’, इमामांचे वेतन वाढवणे इत्यादी आश्वासने होती. त्यांपैकी अनेक आश्वासनांची पूर्तता के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली आहेत. त्यामुळे मुसलमान समुदाय त्यांच्यावर खुश आहे. एम्.आय.एम्.चे असदुद्दीन ओवैसी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ओवैसी यांनी मुसलमानांच्या हिताची मागणी करावी आणि कोणतीही वेळ न दवडता मुख्यमंत्री राव यांनी ती पूर्ण करावी, असे समीकरण आहे. त्यामुळे दुसर्या भाषेत एम्.आय.एम्.चा प्रभाव भाग्यनगर (हैद्राबाद) बाहेर नसला, तरी त्यांनाही मुख्यमंत्री राव घाबरून आहेत. चंद्रशेखर राव यांना हिंदूंची काळजी नाही. हिंदू सहिष्णु आहेत. त्यामुळे राव यांनी त्यांना गृहीत धरले आहे. ‘हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या, त्यांच्यावर अन्याय केला’, तर काही बिघडणार नाही; मात्र अल्पसंख्य समाजाला कुरवाळले नाही, तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो’, हे राव जाणून आहेत. त्यामुळे अल्पसंख्य समाजाच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तेलंगाणा सरकार तत्पर आहे.
तेलंगाणामध्ये गत ७५ वर्षांमध्ये तेथील कोणत्याही सरकारकडून ‘हैद्राबाद मुक्तीदिन’ साजरा करण्यात आलेला नाही. राव यांच्यातही ती धमक नाही. त्यांना धर्मांधांची भीती वाटते. निझाम आणि रझाकार यांच्या तावडीतून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन हैद्राबाद संस्थान भारतीय सैन्य घुसवून मुक्त केले आणि भारतात त्याचे विलीनीकरण केले. तो दिवस ‘हैद्राबाद मुक्तीदिन’ मानला जातो. राव यांना हा दिवस आपला वाटत नाही, तर रझाकार आणि अत्याचारी निझाम जवळचे वाटतात. यातच सर्व आले. परिणामी तेथे शाळेत ‘बीफ पार्टी’चे आयोजन केले जाते. तेलंगाणा सरकारची धोरणे पहाता ते केवळ विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी झटते, हेच समोर येते. सातत्याने एकाच समाजाच्या हितासाठी काम करणार्या आणि हिंदूंच्या कार्यक्रमासाठी कायदा-सुव्यवस्थेची भीती दाखवणार्या राव यांना आता हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.