पशू-पक्ष्यांमध्येही देव पहाणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. कावळा हा शनीचे वाहन असल्याचा भाव ठेवून त्याला पिण्यासाठी पाणी देणे

‘आम्ही चेन्नई सेवाकेंद्रामध्ये रहातो. त्या ठिकाणी सकाळी १० वाजता एक कावळा नियमित येऊन ओरडायचा. हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी पाहिल्यावर त्यांनी कावळा जिथे बसतो, त्या ठिकाणी एका भांड्यात पाणी ठेवण्यास सांगितले. कावळा नियमित पाणी पिऊ लागला. दुसर्‍या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘त्या पाण्यामध्ये अग्निहोत्राची विभूती घालूया, म्हणजे त्यालाही आध्यात्मिक लाभ होईल. तोही ते पाणी पिऊन पुढे-पुढे जाईल. आम्ही बाहेर गेलो किंवा विसरलो, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू स्वतः ‘भांड्यात पाणी आहे ना ?’, हे पहातात. कावळा आल्यावर ओरडला की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू मला सांगायच्या, ‘‘हा कावळा आहे’, असा विचार करायचा नाही, तर हा शनी, म्हणजे धुमावतीदेवाचे वाहन आहे. तो इथे पाणी पिण्यासाठी आला आहे. त्यामुळे त्याचे भांडेही स्वच्छ असायला हवे.’’

श्री. वाल्मिक भुकन

२. कुत्रा दिसल्यास ‘कालभैरव रक्षणासाठी समवेत आल्याचे’ सांगणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना मंदिराच्या बाहेर कुत्रा दिसला, तर त्या कधी ‘तो कुत्रा आहे’, असे म्हणत नाहीत, तर ‘कालभैरव आपल्या रक्षणासाठी आपल्या समवेत आले आहेत’, असे म्हणतात. त्यामुळे आमच्याही मनामध्येही तोच भाव निर्माण झाला आहे.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू, एवढे असामान्य प्रेम, भाव आणि विचार हे केवळ अवतारच साध्य करू शकतो; म्हणून तुम्ही साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहात.’

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई, तमिळनाडू. (१५.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक