भोपाळ येथे ‘मॉडलिंग’ शिकवणार्‍या जुनैद खानने युवतीवर केला बलात्कार !

खानसह दोघांना अटक !

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे ‘मॉडलिंग’ शिकणार्‍या एका मुलीवर जुनैद खान नावाच्या कथित शिक्षकानेच (‘मॉडलिंग टीचर’नेच) बलात्कार केल्याची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये पीडितेने तिचा ‘कृष्णा’ नावाच्या मित्राच्या विरोधातही षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून जुनैद आणि कृष्णा या दोघांना अटक केली आहे.

१. पीडिता येथील बैरागड भागातील सैनिक कॉलनीमध्ये रहाते. तिचा मित्र कृष्णा याने तिला मॉडलिंग क्षेत्रामध्ये नोकरी लावण्याचे आमीष दाखवून स्वत:चा जुनैद खान नावाच्या मित्राशी तिची ओळख करून दिली.

२. जुनैदने तिला ‘मॉडल’ बनवण्याचे आमीष दाखवून प्रशिक्षण देण्यास आरंभ केला. कालांतराने तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊ लागला आणि तिच्यावर बलात्कारही केला.

३. पीडितेने याविषयी तिच्या कुटुंबियांना माहिती दिल्यावर दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यांना अटक केली.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक !