(म्हणे) ‘खासगी मदरशांना हात लावाल, तर देशात आगडोंब उसळेल !’ – मौलाना साजिद रशिदी

मौलाना साजिद रशिदी यांची उत्तराखंडमधील भाजप सरकारला धमकी !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकारने राज्यातील वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व मदरशांना गणवेश लागू करण्यासह तसेच एन्.सी.ई.आर्.टी.ची पुस्तके अभ्यासक्रमात घेण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला मुसलमानांकडून विरोध केला जात आहे. मौलाना साजिद रशिदी यांनी धमकी देतांना म्हटले आहे की, सरकारने खासगी मदरशांना हात लावण्याचा प्रयत्न केला, तर देशात आगडोंब उसळेल.

मौलाना साजिद रशिदी याने म्हटले आहे की, प्रत्येक राज्यात एक मदरसा बोर्ड आहे आणि तो सरकारच्या अखत्यारीत काम करतो. सरकार त्यांना गणवेशाचा आदेश देऊ शकते. येथे सरकार काहीही करू शकते त्याला कुणी रोखू शकत नाही; मात्र खासगी मदरशांमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही; कारण भारतीय मुसलमान ४ टक्के मुसलमानांना खासगी मदरशांमध्ये मौलवी आणि मौलाना बनवण्यासाठी पाठवतात. जर सरकार या मरदशांमध्येही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल, तर सर्व भारतीय मुसलमान याच्या विरोधात उभे ठाकतील आणि असू होऊ देणार नाही. आम्ही सरकारकडून काहीही घेत नाहीत. जे मूर्ख लोक आहेत त्यांनी पैशांसाठी त्यांचे मदरसे सरकारला दिले आहेत आणि त्याचा तोटा त्यांना भोगावा लागत आहे. यामुळेच आमचे वरिष्ठ मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता ) आणि उलेमा (इस्लाम धर्माविषयीचा ज्ञानी) मदरशांसाठी सरकारकडून पैसा घेऊ नये, म्हणून सांगत असतात.

संपादकीय भूमिका

  • सरकारला अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? मौलानाच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
  • देशात हिंसाचार कोण करतो, हे यातून लक्षात येते ! ‘अशा विचारसरणीचे मौलाना मदरशांत मुलांना अशाच प्रकारचे शिक्षण देत असल्याने तेथून जिहादी आतंकवादी निर्माण होतात’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?