सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे महिलांना होऊ शकतो हृदयविकार आणि कर्करोग !

भारतात विकल्या जाणार्‍या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये रसायनांचा अधिक वापर !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारतात विकल्या जाणार्‍या ‘सॅनिटरी नॅपकिन्स’मध्ये रसायनांचा अधिक वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या नॅपकिन्सच्या अधिक वापरामुळे महिलांना हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांचा धोका होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती ‘टॉक्सिक लिंक’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

‘टॉक्सिक लिंक’च्या पदाधिकारी आकांक्षा मेहरोत्रा यांनी यासंदर्भात सांगितले की,  हे नॅपकिन्स आरोग्यासाठी घातक आहेत. या नॅपकिन्समध्ये ‘कारसिनोजन’ (कर्करोगाला चालना देणारी रसायने), ‘रिप्रोडक्टिव टॉक्सिन’ (प्रजनन प्रणालीवर गंभीर परिणाम करणारे पदार्थ), ‘एंडोक्राइन डिसरप्टर्स’ (संप्रेरकांवर परिणाम करणारी रसायने) आणि ‘एलरजीन्स’ (शरिरावर दुष्परिणाम करणारी रसायने) आढळून आले आहेत. त्यामुळे महिलांच्या योनीवर रसायनांचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

संपादकीय भूमिका

  • केंद्र सरकारने भारतातील सॅनिटरी नॅपकिन्स यांचे उत्पादन करणार्‍या सर्व आस्थापनांची कसून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी, तसेच त्यांच्या उत्पादनांचे नियमन करणारी प्रणाली बसवणे आवश्यक आहे !