उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद या बहिणी या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. मधुरा आणि कु. मयुरा तरकसबंद या दोघी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या असून त्यांची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्या दोघींचीही आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. आता त्या दोघींमधील ‘भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार’, यांमुळे त्यांची साधनेत प्रगती होत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. मधुरा तरकसबंद हिची तिच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. मधुरा तरकसबंद

१. वय १ ते ७ वर्षे

‘कु. मधुराचे खेळ देवतांशी संबंधितच असतात, उदा. गणेशोत्सव, नवरात्र इत्यादी सण साजरे करणे.

२. वय ८ ते १२ वर्षे

अ. ती चाणाक्ष असून तिच्यामध्ये ‘नीटनेटकेपणा, शिकण्याची वृत्ती आणि नेतृत्व’, हे गुणही आहेत.

 आ. मधुरा नवीन आणि तांत्रिक गोष्टी फार लवकर आत्मसात करते, उदा. भ्रमणभाष, भ्रमणसंगणक आणि संगणक यांचा वापर करणे.

इ. तिच्यातील प्रेमभावामुळे लहान मुले तिच्याकडे आकर्षित होतात.

ई. तिला शाळेत वक्तृत्व आणि कथाकथन या स्पर्धांत बक्षिसे मिळतात.

उ. मधुरा स्वतःकडून झालेल्या चुकांवर प्रायश्चित्त विचारून घेऊन ते पूर्ण करते.

ऊ. ती तिच्या मैत्रिणींना ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाच्या ‘लिंक्स’ नियमितपणे पाठवते आणि तत्परतेने त्यांचा आढावाही घेते.

 ए. ती शाळेत प्रतिदिन कापूर आणि अत्तर लावून जाते. त्यामुळे तिच्या मैत्रिणी त्यांच्या पालकांना सांगून सात्त्विक उत्पादने घेऊ लागल्या आहेत.

३. स्वभावदोष

आळशीपणा, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे आणि हट्टीपणा.

कु. मयुरा तरकसबंद हिची तिच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणैशिष्ट्ये

कु. मयुरा तरकसबंद

१. वय १ ते ७ वर्षे

अ. कु. मयुरा जिज्ञासू आहे. ती पुष्कळ प्रश्न विचारते.

आ. तिला शाळेमध्ये कविता, गायन, खेळ इत्यादींमध्ये बक्षिसे मिळतात.

२. वय ८ ते १२ वर्षे

२ अ. मयुरामध्ये ‘जिज्ञासू वृत्ती, शिकण्याची वृत्ती, प्रेमभाव, विचारून करणे आणि मनमोकळेपणा’, हे गुण आहेत.

२ आ. सात्त्विकतेची ओढ

१. शाळेत वेशभूषा स्पर्धेत भाग घेतांना तिने ‘देवीचीच वेशभूषा करणार’, असा हट्ट केला होता.

२. शाळेत त्यांना दिवाळीसाठी आकाशकंदील बनवायला सांगितला होता. तेव्हा तिने ‘सनातन संस्थेचा आकाशकंदीलच बनवायचा’, असा हट्ट केला आणि तसाच कंदील बनवून शाळेत नेला. तो त्यांच्या मुख्याध्यापिकांना पुष्कळ आवडल्याने त्यांनी तो शाळेच्या प्रवेशद्वारावर लावला.

३. अनुभूती

तिला नामजप करतांना कधी कधी देवता दिसतात.

४. स्वभावदोष 

आळशीपणा, चालढकलपणा, वेळ वाया घालवणे आणि भावनाशीलता.

कु. मधुरा आणि कु. मयुरा या दोघींची तिच्या आई-वडिलांना जाणवलेली सामाईक गुणवैशिष्ट्ये

कु. मधुरा व कु.मयुराची आई – सौ स्मिता प्रशांत तरकसबंद

१. वय १ ते ७ वर्षे

१ अ. उत्तम स्मरणशक्ती आणि संस्कृत उच्चार स्पष्ट असणे : ‘छोट्या शिशु गटात असल्यापासून दोघीही प्रत्येक वर्षी संस्कृत श्लोक आणि गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतात. त्या स्पर्धेत प्रत्येक वेळी त्यांना बक्षीस मिळते. एवढ्या लहान वयापासूनच त्यांचे संस्कृत उच्चार पुष्कळ स्पष्ट आहेत. त्यांच्या शिक्षिकाही त्यांचे फार कौतुक करतात.

१ आ. देवाची ओढ

१. दोघींना संत आणि देवता यांचे चित्रपट, उदा. संत तुकाराम, गोपालकृष्ण इत्यादी जुने चित्रपट पहायला पुष्कळ आवडतात.

२. मयुरा श्रीकृष्णाचे बासरी धरलेले चित्र नेहमी काढायची. दोघींचीही चित्रकला चांगली आहे.

२. वय ८ ते १२ वर्षे

२ अ. आईला साहाय्य करणे : दोघीही आईला घरकामात साहाय्य करतात, उदा. लादी पुसणे, भाजी चिरणे, पोळ्या करणे इत्यादी.

२ आ. साधनेची आवड

१. त्यांनी नामजप लिहिण्यासाठी वही सिद्ध केली आहे. तिच्यात त्या प्रतिदिन नामजप लिहितात.

२. दोघीही ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग नियमित पहातात आणि त्यात सांगितलेल्या कृती लगेच करण्याचा प्रयत्न करतात, उदा. त्यांनी नियोजन आणि गुणसंवर्धन यांची सारणी बनवली आहे.

३. त्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतात. त्या स्वतःच्या चुका सारणीत लिहितात. त्यांचा चुकांचा अभ्यासही चांगला आहे.

कु.मधुरा व कु.मयुराचे वडील श्री . प्रशांत तरकसबंद

२ इ. सेवेची आवड

१. त्या आमच्या वसाहतीत (‘सोसायटी’त) सात्त्विक उत्पादनांचे वितरण करण्याची सेवा करतात.

२. त्या ग्रंथप्रदर्शन कक्षाच्या पूर्वसिद्धतेसाठी साहाय्य करतात.

३. त्या प्रतीवर्षी महाशिवरात्रीच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर ग्रंथ पुसणे, ग्रंथ आणि प्रसारसाहित्य लावणे इत्यादी सेवा करतात.’

श्री . प्रशांत तरकसबंद आणि सौ स्मिता प्रशांत तरकसबंद ( कु.मधुरा व कु.मयुराचे आई -वडील) नेरूळ, नवी मुंबई (१०.६.२०२०)