घुसखोरी करणारा १ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर दुसर्‍याला अटक !

जम्मू – येथील आर्एस् पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या एका पाकिस्तानी आतंकवाद्याला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गोळ्या घालून ठार केले, तर दुसर्‍याला पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

हे दोघे रात्री २ च्या सुमारास भारताच्या सीमेत घुसखोरी करत असल्याचे पाहून सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र ते पळू लागल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यापूर्वी राजौरी येथील सीमेजवळ सैन्याने एका पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार केले होते.