इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या रावळपिंडी शहरातील एका गुप्त ठिकाणी काही मासांपासून चीन आणि पाकिस्तान जैविक शस्त्रांवर काम करत आहेत. तेथे कोरोनापेक्षा अधिक जीवघेणा आणि घातक विषाणू बनवला जात आहे, असे वृत्त ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
‘Deadly Covid-like Pathogens’: Is China-Pakistan Secretly Developing ‘Lethal’ Virus In Rawalpindi?#TNDIGITALVIDEOS #China #Pakistan pic.twitter.com/AhI0k1f6BD
— TIMES NOW (@TimesNow) November 8, 2022
१. चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ आणि पाकिस्तानच्या ‘संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था’ या विषाणूवर संशोधन करत आहेत. यासाठी रावळपिंडीत एक गुप्त प्रयोगशाळा सिद्ध करण्यात आली आहे. येथे विशेष सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
२. चीनच्या वुहान शहरातच सर्वप्रथम, म्हणजे वर्ष २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्ष २०१९ च्या अखेरीस कोरोनाचा वेगाने संसर्ग चालू झाला. २ वर्षांनंतरही जगभरातून कारोना विषाणू पूर्णपणे संपलेला नाही.
संपादकीय भूमिकाअसे असेल, तर आता जगाने चीन आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालावा ! |