उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात धर्मांधाने हिंदु मुलीचे धर्मांतर करून बलपूर्वक केला विवाह

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

(डावीकडून) आरोपी कफील अहमद, त्याची आई जाहिदा बेगम आणि भाऊ फरीद अहमद

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – येथील कफील अहमद नावाच्या धर्मांध मुसलमानाने एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि नंतर तिच्याशी बळजोरीने विवाह केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत केलेल्या तक्रारीत आरोपीच्या विरोधात मारहाण, बलात्कार आणि मुलीशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. आरोपी कफील अहमद याच्याकडून होत असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून आपल्या सूनेने आत्महत्या केल्याचा आरोपही पीडित मुलीच्या आईने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. मुख्य आरोपी कफील अहमद याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

याविषयीच्या तक्रारीत म्हटले आहे की, कफील अहमद याने पीडित मुलीचा अश्‍लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास प्रारंभ केला. एक दिवस कफीलने पीडित मुलीला लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे नेले. यानंतर ५ सप्टेंबर २०२२ या दिवशी  तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी बळजोरीने विवाह केला. नंतर बळजोरीने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. यासह पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली.

या तक्रारीत पीडितेच्या आईने आणखी एक मोठा आरोप केला आहे की, कफील अहमद तिच्या सुनेच्या आत्महत्येला उत्तरदायी आहे. आरोपीकडून होणार्‍या लैंगिक छळाला कंटाळून आपल्या सूनेने आत्महत्या केल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला आहे. आपल्या मुलीच्या छळात कफील अहमदला त्याची आई जाहिदा बेगम आणि भाऊ फरीद अहमद यांनी पाठिंबा दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असतांनाही प्रतिदिन लव्ह जिहादच्या घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद ! हे धर्मांधांनी पोलीस आणि प्रशासनाला उघड उघड दिलेले आव्हानच म्हणावे लागेल ! आता सरकारने लव्ह जिहादच्या विरोधात अधिक कठोर कारवाई केली पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !