हिंदूंच्या संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कारवाई !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील दीपक विहार भागामध्ये रस्त्यावर नमाजपठण केल्याच्या विरोधात हिंदूंच्या संघटनांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) आणि अज्ञात लोक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. नमाजपठण करणार्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
गाजियाबाद: सड़क बंद कर नमाज पढ़ने पर विवाद, हिंदू संगठनों ने जताई आपत्ति, FIR दर्ज, इमाम और अज्ञात लोगों के खिलाफ केस दर्ज, सड़क पर नमाज पढ़ने की तस्वीर वायरल, गाजियाबाद के दीपक विहार इलाके का मामला pic.twitter.com/p9Yh3cnVkG
— ZEE HINDUSTAN (@ZeeHindustan_) November 7, 2022
१. याविषयी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री विकास मिश्रा यांनी सांगितले की, मी स्वतः नमाजपठणाचा व्हिडिओ ट्वीट केला होता. येथे मशीद आहे. तेथे पूर्वी मदरसा चालू करण्यात आला होता. आता त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. यावरून पूर्वी वाद झाला होता. तेव्हा मशीद बांधली जाऊ शकली नव्हती. या मशिदीच्या ५०० मीटर परिसरात एक मोठी मशीदही आहे. येथे मोठ्या संख्येने मुसलमान नमाजपठण करू शकतात; मात्र जे जाणीवपूर्वक हिंदूंच्या भागात येऊन नमाजपठण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना त्रास देण्यासाठीच असे केले जाते. माझ्या ट्वीटनंतर पोलीस अधीक्षकांनी नोंद घेऊन गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे की, यापुढे या रस्त्यावर नमाजपठण होऊ देणार नाही.
२. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, नमाजपठण केल्यामुळे रस्ता बंद होतो. त्यामुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. पोलिसांनी यांना रोखले पाहिजे आणि उत्तरदायींवर कारवाई केली पाहिजे.
संपादकीय भूमिका
|