‘‘दुसर्‍या धर्मातील महिलांना इस्लाममध्ये आणणे, हे सन्मानाचे कृत्य !”

  • विधवा हिंदु महिलेवर बलात्कार करणारा ९ मुलांचा पिता असलेला महंमद शाकीर म्हणतो

  • महिलेचे धर्मांतर करवून केला विवाह !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका प्रकरणामध्ये एका हिंदु विधवेच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवून महंमद शाकीर या ९ मुलांच्या धर्मांध मुसलमानाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार करून तिची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करण्याचे तिला धमकावले. तसेच तिच्यावर विवाह करण्याचा दबाव बनवला. नाईलाजास्तव तिला विवाह करावा लागला. हिंदु पीडितेला नंतर समजले की, शाकीर हा मुसलमान असून तो ९ मुलांचा पिता आहे. तिने याविषयी त्याला विचारणा केली असता तो म्हणाला की, आम्हाला दुबईहून सूचना मिळाल्या आहेत की, एकाहून अधिक विवाह करणे, तसेच दुसर्‍या धर्मातील महिलांना इस्लाममध्ये आणणे, हे सन्मानाचे कृत्य आहे.


(‘लव्ह जिहाद हे थोतांड आहे’, असे म्हणणार्‍या महाभागांना आता काय म्हणायचे आहे ? – संपादक) 
शाकीर पीडितेच्या पहिल्या पतीपासून असलेल्या मुलीचे नाव पालटण्यासाठी दबाव टाकत होता. त्यानंतर पीडितेने न्यायासाठी आधी पोलीस आणि नंतर न्यायालयात धाव घेतली. पोलीस पीडितेची तक्रार ऐकून घेत नसल्याचे न्यायालयाला समजल्यावर त्याने पोलिसांना फटकारले. (मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना त्याच्या पोलिसांकडून लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदु महिलेला अशा प्रकारे वागणूक मिळणे अपेक्षित नाही ! राज्य सरकार संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करील, अशी अपेक्षा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • इस्लाममध्ये असे म्हटलेले नाही’, असे मुसलमानांच्या संघटना, धार्मिक नेते आदी सांगतील का ?
  • शाकीर याने केलेला दावा आतापर्यंतच्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना पहाता खराच आहे, असेच समजायला हवे ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
  • ‘लव्ह जिहाद’च्या राक्षसापासून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रव्यापी लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासमवेत हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे, हे जाणा !