इस्लामी शाळेच्या अध्यक्षाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील डोंगरी येथील हबीब इस्माईल शाळेचे अध्यक्ष जावेद श्रॉफ यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. शाळेतील एका शिक्षिकेने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी या शाळेच्या कर्मचार्‍यांनी जावेद श्रॉफ यांच्यावर त्यांनी दोन मासांहून अधिक काळ वेतन न दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. जावेद श्रॉफ हे यापूर्वी आणखी एका गुन्ह्यात अडकले  होते.