सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
मधुर मधुर सुहास्यवदन ।
घेई आकर्षून मम मन ।। १ ।।
कांती देखता गगनीचे चंद्रबिंब ।
तेज मुखावरी जणू सूर्यनारायण ।। २ ।।
चक्षू पहाता अथांग सागर ।
साधकांप्रती दयार्द्र (टीप १) मन ।। ३ ।।
अखंड वरदायी ते करकमल ।
प्रसृत करिती (टीप २) दिव्य ज्ञान सकल ।। ४ ।।
निर्गुण दत्तरूप चरणकमल ।
होई स्थिर चित्त, दर्शने कृपावत्सल ।। ५ ।।
मनोहर गोजिरे रूप शांत ।
पहातां जाती पळून श्रम ।। ६ ।।
स्वरूप ज्यांचे करुणासिंधु ।
जनमानसी जो कल्पतरु ।। ७ ।।
लेखणी ज्यांची वेदमंत्र ।
प्रसविते ब्राह्म अन् क्षात्र तेज ।। ८ ।।
ऐसे थोर गुरु (टीप ३) कलियुगी ।
शरणागतांसी सत्वर रक्षती ।। ९ ।।
टीप १ – दयेने ओथंबलेले
टीप २ – प्रसृत करिती – प्रसृत म्हणजे पसरलेले आणि प्रसृत करिती म्हणजे पसरवतात, उदा. ज्ञानाचा प्रसार करतात.
टीप ३ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |