हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेट खेळाडूला धर्मांधांचा विरोध !

नवी देहली – पाकिस्तानी मुसलमान क्रिकेट खेळाडू शाहजवाज दहानी यांनी सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे धर्मांध मुसलमानांनी त्यांना लक्ष्य करत त्यांना शिवीगाळ केली. दुसरीकडे भारतीय नागरिकांनी दहानी यांचे समर्थन करत त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अतीक अहमद नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीने, ‘ए हिंदु वंशाच्या, तुला मैदानामध्ये काही करता येत नाही आणि तू दिवाळी साजरी करत आहेत’, अशा शब्दांत दहानी यांच्यावर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

अन्य धर्मियांचा सन्मान करणे, तसेच त्यांच्या सणांमध्ये त्यांना शुभेच्छा देणे, ही मानवता आहेत. तीही धर्मांध मुसलमानांकडे नाही. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !