-
धार (मध्यप्रदेश) येथील घटना
-
तरुणीला जाळ्यात ओढण्याचा केला होता प्रयत्न !
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील धार जिल्ह्यात असलेल्या पीथमपूर येथे काँग्रेसचा नेता आशिक पटेल याने त्याची मुले आणि अन्य सहकारी यांच्या साहाय्याने २४ वर्षीय रूपेश बिर्ला या युवकाची हत्या केली. साधारण ६ मासांपूर्वीच पटेल याला ‘असंघटित कामगार आणि कर्मचारी काँग्रेस’च्या मध्यप्रदेश राज्याच्या उपाध्यक्षपदी नेमण्यात आले होते.
50 साल का कॉन्ग्रेस नेता 22 साल की लड़की के पीछे पड़ा था, प्रपोजल ठुकराया तो उसके प्रेमी रुपेश की हत्या कर खेत में गाड़ दिया#MadhyaPradesh https://t.co/7tS8xbzjuN
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 17, 2022
अ. ५० वर्षीय आशिक पटेल याने त्याच्या कार्यालयात काम करणार्या एका २२ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. तिने नकार दिल्याने त्याने, ‘तू तुझा प्रियकर रूपेश याला सोडून दे अन्यथा मी रूपेश आणि त्याचे कुटुंबीय यांची हत्या करीन’, अशी धमकी दिली होती.
आ. यानंतर अचानक १२ ऑक्टोबर या दिवशी रूपेश गायब झाला. रूपेशच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट करून पटेल याच्यावर संशय असल्याचे सांगितले. पटेलला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला.
इ. धार जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ८ लोकांनी मिळून रूपेशची हत्या केली. हत्येनंतर अजरुद्दीन आणि असलम हे दोघे फरार असून आशिक पटेल याच्यासह अन्य ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
आशिक पटेलच्या घरावर फिरवला बुलडोझर !
रूपेशच्या हत्येवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करून पटेल याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. प्रशासनाने पटेलच्या अवैध इमारतीवर बुलडोझर फिरवून त्याला पाडले आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारांचा भरणा असलेली काँग्रेस ! अशा वासनांध मुसलमान नेत्यांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! |