एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांच्यावर गुन्हा नोंद !

हिंदूंच्या विरोधात अश्‍लाघ्य विधाने केल्याचे प्रकरण

एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली

संभल (उत्तरप्रदेश) – हिंदूंच्या विरोधात अश्‍लाघ्य विधान करणारे उत्तरप्रदेशचे एम्.आय.एम्.चे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथेच त्यांनी एका सभेमध्ये आक्षेपार्ह विधाने केली होती. यातील काही विधाने आता समोर आली आहेत.

सौजन्य : Zee Uttar Pradesh UttaraKhand

आम्ही तुमच्यावर ८३२ वर्षे राज्य केले ! – शौकत अली  

या सभेत शौकत अली म्हणाले होते की, तुम्ही (हिंदु) आम्हाला धमकी देत आहात. ‘तुम्ही (हिंदू) किड्या-मुंग्यांसारखे आहात. आम्ही भारतावर ८३२ वर्षे राज्य केले आहे. तुम्ही आमच्या बादशाह समोर पाठीमागे हात बांधून हुजेरगिरी करत होता. आम्ही तुमच्या बहिणीला ‘मल्लिका-ए-हिंदुस्थान’ (राणी) बनवले. जोधाबाई कोण होत्या ? आम्ही कधीही भेदभाव केला नाही. आमच्यापेक्षा मोठा धर्मनिरपेक्षक कोण आहे ? आम्ही आमच्यासमवेत तुम्हालाही वर (उत्कर्ष) आणत आहोत. एक साधू उभा राहून म्हणतो, ‘तुमचे (मुसलमानांचे) तुकडे तुकडे करून फेकून देऊ.’ म्हणजे आम्ही गाजर, मुळा, कांदा आहोत. साधू साहेब, जर तुम्ही मुसलमानांचे राग आलेला चेहरा पहाल, तर तुमची विजार पिवळी होईल.’

संपादकीय भूमिका

केवळ गुन्हा नोंद करून थांबू नये, तर अशांना अटक होऊन त्यांना शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी पाठपुरावा घेणे आवश्यक आहे !