|
धुळे – धुळे येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत धर्मांधांनी ‘गुस्ताख ऐ नबी की एकही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’‘, तसेच ‘अगर भारत में रहना होगा, नारा ऐ तकबीर, अल्ला हू अकबर कहेना होगा’, अशा आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. त्याविरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धुळेकर नागरिक यांच्या वतीने १० ऑक्टोबरला प्रतिकात्मक मोर्चा काढून या गुंडगिरीचा विरोध करण्यात आला. ‘ज्या प्रकारे कोणतीही चौकशी न करता श्रीरामनवमी उत्सव समितीच्या आयोजकांवर गुन्हे नोंदवण्यात आले, त्याचप्रमाणे राज्यघटनाविरोधी घोषणा देणार्या ईद-ए-मिलादच्या रॅलीच्या आयोजकांविरोधात त्वरित कारवाई करत गुन्हे नोंद करावेत’, अशी आग्रही मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात आली. या निषेध मोर्च्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अधिवक्ता रोहित चांदोडे, भाजपचे श्री. हिरामणअप्पा गवळी, हर्षल विभांडीक, मनसेचे अधिवक्ता प्रसाद देशमुख, विश्व हिंदु परिषदेचे श्री. मनोज जैन, शिवसेनेचे श्री. गुलाब माळी, रा.स्व. संघाचे डॉ. योगेश पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हर्षल गवळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सचिन वैद्य, इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशी यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांचे अनेक कार्यकर्ते अन् पदाधिकारी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|