कोझीकोड (केरळ) येथे शाळेबाहेर जिहादी संघटनांची निदर्शने

विद्यार्थिनीला हिजाब घालण्यास अनुमती न दिल्याचे प्रकरण

कोझीकोड – येथील ‘प्रोव्हिडनस गर्ल्स’ या उच्च माध्यमिक शाळेतील ११वीच्या विद्यार्थिनीला हिजाब घालण्यास अनुमती न दिल्याने जिहादी संघटनांनी शाळेच्या बाहेर निदर्शने केली. मुलीच्या पालकांच्या मध्यस्थीनंतरही शाळेच्या प्रशासनाने हिजाबविषयीची भूमिका पालटण्यास नकार दिल्याने विद्यार्थिनीला शाळा सोडावी लागली. शाळेच्या परिसरात आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलीने शाळेच्या गणवेशाचा नियम पाळावा, तसेच तिला हिजाब घालण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे शाळेच्या अधिकार्‍यांनी मुलीला कळवले होते.

ही शाळा सरकारी अनुदानित असल्याने हिजाबला अनुमती दिली पाहिजे, असा दावा जिहादी विद्यार्थी संघटनांनी केला. मुसलमान विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या शिक्षण आणि धर्म यांविषयीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे.  याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनीही आंदोलन केले.

संपादकीय भूमिका

एरव्ही हिंदूंना ‘धर्म चार भिंतींच्या आत ठेवा’, असा सल्ला देणारे पुरोगामी, निधर्मीवादी, काँग्रेसी आदी आता मुसलमानांना असा सल्ला का देत नाहीत? याविषयी ते गप्प का ?