नवरात्रीच्या वेळी भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून देवीमाहात्म्य ऐकतांना रामनाथी आश्रमातील यज्ञस्थळी देवी प्रकट झाल्याची तेलंगाणा येथील साधकाला आलेली अनुभूती

‘वर्ष २०२० मध्ये नवरात्रीच्या शुभ काळात आम्हाला साक्षात् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीतून देवीमाहात्म्य ऐकायला मिळाले. हा उच्चतम सत्संग दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आम्हा साधकांना हा अमूल्य क्षण अनुभवायला मिळणे’, यापेक्षा दुसरी मोठी कृपा कोणती असू शकते ?’, असे मला वाटले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘नवरात्रीच्या ९ व्या दिवशी यज्ञस्थळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासमोर देवी प्रगट झाली असून देवीने त्यांना वरदान मागायला सांगितले’, असे दिसणे

नवरात्रीच्या ९ व्या दिवशी, म्हणजे २५.१०.२०२० या दिवशी मला एक अनुभूती आली. सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘रावणाचा वध होण्यासाठी श्रीरामाने देवीमातेचे नवरात्रीचे व्रत केले’, हा विषय सांगत होत्या. तेव्हा मला दिसले, ‘साक्षात् देवी रामनाथी आश्रमाच्या यज्ञस्थळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासमोर प्रगट झाली आणि म्हणाली, ‘तुझ्या प्रार्थनेमुळे मी प्रसन्न झाले आहे. तुला पाहिजे तो वर माग !’

श्री. चेतन गाडी

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी देवीकडे परात्पर गुरु डॉक्टरांना यज्ञस्थळी घेऊन येण्याची अनुमती मागून अत्यंत आदराने त्यांना यज्ञस्थळी घेऊन येणे आणि देवीला अन् गुरुदेवांना वंदन करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीला म्हणाल्या, ‘माते, मी माझ्या गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) येथे घेऊन येते. कृपया मला अनुमती दे.’ देवीमातेने त्यांना अनुमती दिली. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा यांच्या मुखावर अत्यंत कृतज्ञताभाव आणि आनंद दिसू लागला. त्या धावतच परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, ‘साक्षात् देवी प्रगट झाली आहे. कृपया आपण चलावे.’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉक्टरांना अत्यंत आदराने यज्ञस्थळी घेऊन आल्या. परात्पर गुरुदेव देवीमातेच्या बाजूला उभे राहिले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्पर गुरुदेव आणि देवीमाता यांच्या चरणी शरणागतभावाने वंदन केले.

३. देवीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वर मागण्यास सांगणे आणि त्यांनी वर मागितल्यावर देवीने ‘तथास्तु’ म्हणून ‘तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील’, असा आशीर्वाद देणे

देवी पुन्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना म्हणाली, ‘वरदान माग.’ त्या देवीला म्हणाल्या, ‘माझ्या गुरुदेवांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा जो संकल्प केला आहे, तो पूर्ण व्हावा आणि या पवित्र कार्यासाठी जीवन समर्पित केलेल्या सनातनच्या सर्व साधकांचा उद्धार व्हावा !’ यावर माता जगदंबा म्हणाली, ‘तथास्तु !’ तू स्वतःसाठीही काही तरी माग.’ तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘मला गुरुचरणी एकरूप व्हायचे आहे.’ देवीमाता म्हणाली, ‘तथास्तु ! तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील !’

ही संपूर्ण घटना घडत असतांना सर्व साधक यज्ञस्थळी उपस्थित होते. त्यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसत होत्या. त्यांचे देवीमातेशी झालेले संपूर्ण संभाषण त्यांना ऐकू येत होते; परंतु देवीमाता दिसत नव्हती. शेवटी सर्व साधक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी शरण जाऊन म्हणाले, ‘आम्ही कृतकृत्य आणि धन्य धन्य झालो.’

मला परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कृपेमुळेच हे अविस्मरणीय दृश्य अनुभवता आले. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. चेतन गाडी, तेलंगाणा (१.११.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक