थारपारकर (पाकिस्तान) येथे धर्मांध मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार !

पाकमधील असुरक्षित हिंदू !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर येथे कामली नावाच्या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर मुश्ताक आणि नबी बख्श बाजिर या धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जवळच्या जंगलात फेकून दिले. या घटनेची माहिती ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तानी मायनॉरिटी’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली आहे. बलात्कार्‍यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही.