नवरात्रीच्या काळात गरबा नृत्य करतांना देवीला प्रार्थना केल्यावर अंगावर रोमांच येऊन कृतज्ञताभाव दाटून येणे

नवरात्रीच्या काळात गरबा नृत्य करतांना देवीला प्रार्थना केल्यावर ‘श्री दुर्गादेवी सौ. नीता सोलंकी यांच्या रूपात आली आहे’, असे जाणवणे आणि अंगावर रोमांच येऊन कृतज्ञताभाव दाटून येणे

श्री. गुरुप्रसाद बापट

‘नवरात्रीच्या कालावधीत देवीच्या उपासनेसाठी ‘गरबा’ हे पारंपरिक नृत्य करतांना साधकांवर त्याचे कोणते आध्यात्मिक परिणाम होतात ?’, याचा अभ्यास करण्यासाठी रामनाथी आश्रमात एका ठिकाणी नृत्यसेवा करायची होती. एका पटलावर ‘श्री दुर्गादेवी’चे छायाचित्र ठेवले होते. छायाचित्राच्या पाठीमागे ‘जय अंबे’ असे लिहिलेला कुंभ होता.

मी प्रथमच हे नृत्य करत होतो. सौ. नीता सोलंकीताई समवेत असल्याने मला त्यांच्या नृत्य पद्धतीचे (steps) अनुकरण सहज करता आले. नृत्य करतांना मी श्री दुर्गादेवीला प्रार्थना करत होतो, ‘तूच मला नृत्य करायला शिकव आणि तूच माझ्याकडून नृत्य करून घे.’ त्या वेळी ‘श्री दुर्गादेवीच सौ. नीताताईंच्या रूपात आली आहे’, असे मला जाणवले. मधून मधून माझ्या अंगावर रोमांच येत होते आणि माझा कृतज्ञताभाव दाटून येत होता. श्री दुर्गादेवी आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या कृपेमुळे आम्हाला ही अनमोल संधी मिळाली, याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती. मला देहबुद्धीचा विसर पडला होता. माझा आत्मविश्वास वाढला होता. सौ. नीताताई आम्हाला सोप्या पद्धतीने शिकवत होत्या. त्या आमच्याकडे कौतुकाने पहात होत्या. त्यांनी अल्प कालावधीतच आम्हाला आपलेसे केले.’

– श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२०.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक