मुगुळुगेरे (कर्नाटक) येथील श्री बीरलिंगेश्वर देवस्थानात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ !

शिकारीपूर (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिकारीपूर तालुक्यातील मुगुळुगेरे या गावातील श्री बीरलिंगेश्वर या मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि भक्त यांनी भावपूर्ण प्रार्थना केली.
प्रार्थना पूर्ण होताच श्री बीरलिंगेश्वर देवाच्या मूर्तीच्या उजव्या भागावरील एक बिल्वपत्र त्याच्या चरणाजवळ पडले. यावरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व भक्तांना श्री बीरलिंगेश्वर देवाने आशीर्वाद दिल्याची प्रचीती उपस्थित सर्वांना आली.