(म्हणे) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना सोडा, अन्यथा रस्त्यावर उतरू !’ – झियाउद्दीन सिद्दिकी, मुस्लिम नुमाइंदा काऊन्सिल

चोराच्या उलट्या बोंबा !

संभाजीनगर – पुणे येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी ‘पी.एफ्.आय.’ संघटनेच्या ४१ जणांना कह्यात घेतल्यानंतर ‘मुस्लिम नुमाइंदा काऊन्सिल’ संघटनेतील नेत्यांचा तीळपापड झाला आहे. ‘पुणे येथील ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी ‘मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल’चे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी २५ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकार परिषदेत दिली. (देशविरोधकांच्या बाजूने राहून अशी धमकी देणार्‍या सिद्दिकींनाच अटक करायला हवी, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक)

झियाउद्दीन सिद्दिकी म्हणाले की,

१. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता संभाजीनगर येथे विविध जातीधर्मांच्या लोकांना साहाय्य केले. (याचा अर्थ आतंकवादी कारवाया करायला रान मोकळे आहे, असे सिद्दीकींना म्हणायचे आहे का ? – संपादक)

२. कोरोनाग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार केले. केवळ सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना अटक केली जात आहे. हे खोटे गुन्हे रहित करून त्यांची निर्दोष मुक्तता करावी. अशी दडपशाही सहन केली जाणार नाही. आम्ही शांत आहोत, याचा अपलाभ घेऊ नका. (‘मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल’च्या माजी अध्यक्षांनी अशी धमकी पाकिस्तानात जाऊन द्यावी. देशात न्यायव्यवस्था असल्याने ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांना सोडायचे किंवा कारागृहात पाठवायचे याचा निवाडा न्यायालय करेल ! – संपादक)

३. भारतात ‘सीमी’ संघटनेवर बंदी आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांना अद्याप न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. (विलंबाने चालणार्‍या न्यायप्रक्रियेचा परिणाम ! – संपादक)

४. हिंदुद्वेषी झाकीर नाईक यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे. जोपर्यंत न्यायपालिका त्यांना दोषी मानत नाही, तोपर्यंत ते आमच्यासाठी निर्दोष आहेत. (हिंदुद्वेषी झाकीर नाईक परदेशात पळून गेल्यामुळे त्याच्यावरील खटल्यांचा न्यायनिवाडा कसा होणार ? झाकीर नाईकचे समर्थन करणारे देशासाठी घातक आहेत. देशद्रोह्यांचे समर्थन करणारी अशी पिलावळ देशात वाढत असल्याने हिंदूंनी सतर्क आणि संघटित रहाणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • असे वक्तव्य करणार्‍यांना कठोर शिक्षाच देणे आवश्यक !
  • उघडपणे शत्रूराष्ट्राच्या घोषणा देणारे निर्माण होणे, हा मुसलमानांना डोक्यावर बसवल्याचा परिणाम !