संशयितांना न्यायालयात नेतांना घडली घटना !
नांदेड – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) २२ सप्टेंबर या दिवशी देशात विविध राज्यांतील विविध शहरांत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’च्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या प्रकरणी ‘एन्.आय.ए’ने नांदेड येथून एकास, तर परभणी येथून ४ जणांना कह्यात घेतले आहे. या ५ जणांना न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर या प्रकरणातील १ आरोपी पसार आहे. ५ आरोपींना न्यायालयात उपस्थित करत असतांना ‘पी.एफ्.आय’च्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर ‘भाजप मुर्दाबाद, ‘ए.टी.एस्.’ परत जा’, अशा घोषणा दिल्या.
संपादकीय भूमिकादेशात राहून देशविघातक कार्य करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे ! |