(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या सांगण्यावरून धाडसत्र चालू !’ – महंमद शेख, पुणे जिल्हाध्यक्ष, पी.एफ्.आय.

‘चोराच्या उलट्या बोंबा’अशी भूमिका असलेली जिहादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया !

पुणे – राज्यभरात आमच्या संघटनेच्या २० नेत्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या आदेशानेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) आमच्यावर ही कारवाई केली आहे. आमचा विनाकारण छळ चालू आहे. आमच्या नेत्यांना ४ – ५ वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक; म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही, आम्हाला आतंकवाद्यांसारखी वागणूक मिळत आहे, असे आरोप पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पी.एफ्.आय.) पुणे जिल्हाध्यक्ष महंमद शेख यांनी केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पी.एफ्.आय.च्या कार्यालयांवर धाड टाकून कारवाई केली आहे. पुण्यातूनही कोंढवा भागातील पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अनेक राज्यांतील गुप्तचर संस्थांनी पी.एफ्.आय.ला संशयित ठरवले आहे. ‘ऑल इंडिया सुफी सज्जादनशीन कौन्सिल’ या इस्लामी संघटनेनेही पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची मागणी केली होती. जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’ अनेक भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतली आहे. ‘पी.एफ्.आय.’ला भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लामी राष्ट्र घोषित करायचे आहे. अशा संघटनेवर लवकरात लवकर कायमस्वरूपी बंदीच आणायला हवी !