(म्हणे) ‘भाजपचा मुसलमानविरोधी अजेंडा पुढे करण्याकरताच या धाडी टाकण्यात आल्या !’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

पी.एफ्.आय. वरील कारवाईचे प्रकरण

पुणे – अन्वेषण यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो; परंतु त्याचा राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या ? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते ? त्यांच्याकडे किती निधी मिळाला ? देशविरोधी कारवायांची किती कागदपत्रे मिळाली ? हे आपण येत्या २४ घंट्यांत लोकांसमोर मांडावे अन्यथा सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुसलमानविरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने टाकलेल्या धाडीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी वरील वक्तव्य केले आहे.

संपादकीय भूमिका

  • एम्.आय.एम्.समवेत युती करणार्‍या प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अजून काय अपेक्षा करू शकतो ?
  • देशात पी.एफ्.आय.विरुद्ध दंगली भडकावणे, आतंकवाद्यांशी संबंध आदी गुन्हे नोंद आहेत. ही भारतातील एक कट्टर जिहादी आतंकवादी संघटना आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी उशिरा का होईना; पण जिहादी संघटना पी.एफ्.आय.च्या विरोधात कारवाई चालू केली आहे, असे असतांना आंबेडकर अन्वेषण यंत्रणांकडेच पुरावे मागत आहेत, यावरून ते एकप्रकारे आतंकवादाची पाठराखण करत आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?