दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व सरकारचे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मुंबई – शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्या घेण्याची शिवसेनेची अनेक वर्षांपासूनहीची परंपरा आहे. या परंपरेला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य करू नका. दसरा मेळाव्याला येतांना उत्साहाने, शिस्तीने आणि गुलाल उधळत या; पण बेशिस्तपणा करू नका. या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व सरकारचे आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याविषयीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बाजूने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील भूमिका मांडली.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे प्रशासनाकडून पालन करण्यात येईल. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्व काळजी राज्य सरकार घेईल.