तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंदोलनस्थळी मनोगत व्यक्त करतांना भारतीय जनता पक्षाचे श्री. सुदर्शन खाडे

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे २१ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर नगराध्यक्षा जयश्री गाट यांना निवेदन देण्यात आले, तर पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब हजारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. आंदोलनात ‘चांदी असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ससे, दुर्गवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील, भारतीय जनता पक्षाचे श्री. सुदर्शन खाडे आणि शहराध्यक्ष श्री. सुभाष कागले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. संदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनासाठी हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आंदोलनानंतर हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ 

उपस्थित संघटना आणि राजकीय पक्ष

मराठा समाजाचे श्री. मोहन वाईंगडे आणि श्री. राजेश भोजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. उमेश दैणे, व्यावसायिक श्री. शिवराज नाईक, शिवसेनेचे श्री. राहुल पोतदार, लोककल्याण ग्राहक कल्याण संस्थेचे हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, श्रीराम प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे कार्यकर्ते यांसह ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

विशेष

१. या आंदोलनासाठी कसबा सांगाव, रेंदाळ, तळंगदे, हुपरी येथील धर्मप्रेमी उपस्थित होते.

२. ‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी येथे घेण्यात आलेले आंदोलन हे शिस्तबद्ध होते’, असे मत एका पोलीस अधिकार्‍याने व्यक्त केले.