ठाणे महानगरपलिकेच्या क्षेत्रात वराहज्वराच्या (स्वाईन फ्ल्यू) ९ नव्या रुग्णांची नोंद

ठाणे, २२ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात वराहज्वर (स्वाईन फ्ल्यू) या आजाराने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला आहे. मागील काही दिवसांपासून वराहज्वराचा वाढता संसर्ग आटोक्यात आला होता; मात्र २० सप्टेंबर या दिवशी ठाणे महानगरपलिकेच्या क्षेत्रात ९ नव्या वराहज्वराच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वराहज्वराने बाधित रुग्णांची संख्या ५४१ वर गेली आहे. पैकी ४५२ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.