१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करतांना माझ्या मनाची स्थिती निर्विचार आणि आनंदमय होती.
२. काही वेळासाठी मला ‘केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि मी एवढ्या दोघीच आहोत’, असे वाटत होते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे मार्गदर्शन झाल्यावर शेवटी श्री गुरूंचा श्लोक म्हणतांना डोळे मिटल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले विशाल रूपात दिसत होते. ‘त्यांच्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्यांच्या चरणांजवळ बसल्या आहेत. आम्ही सर्व साधक प.पू. डॉक्टरांच्या समोर त्यांच्या चरणांजवळ बसलो आहोत’, असे मला दिसले.’
– कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |