
गुरुग्राम (हरियाणा) – येथील ‘स्पा सेंटर’मध्ये १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला बलपूर्वक वेश्याव्यवसायात ढकलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती कुटुंबियांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी ‘स्पा सेंटर’चे संचालक रुबेल आणि सद्दाम यांच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
१. मूळची देहलीची रहाणारी १४ वर्षांची मुलगी कौटुंबिक अडचणींमुळे नोकरीच्या शोधात होती. या कालावधीत तिला एक महिला भेटली. त्या महिलेने तिला गुरुग्राममध्ये एका ‘स्पा सेंटर’मध्ये नोकरी दिली.
२. अल्पवयीन मुलगी तेथे कामासाठी जाऊ लागली. ३-४ दिवसांनी एके दिवशी ‘स्पा सेंटर’मध्ये तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केला. नंतर तिला ३-४ तरुणांसह एका खोलीत जाण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्याने तिला बलपूर्वक खोलीत ढकलून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर अनेकांनी त्या मुलीवर बलात्कार केला.
Gurugram Rape Case: “स्पा सेंटर में रोजाना 10 से 15 लोग करते थे मेरा रेप”, 14 साल की नाबालिग ने बताई आपबीती #Gurugram #RapeCasehttps://t.co/cZSNAEfJnR
— लोकमत हिन्दी (@LokmatNewsHindi) September 16, 2022
३. या वेळी ‘स्पा सेंटर’च्या चालकाने मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओही बनवला. परिस्थिती पाहून मुलीने कामावर येण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन ‘ब्लॅकमेल’ करण्यास चालू केले. मुलगी खूप घाबरली आणि पुढील ४-५ दिवस ‘स्पा सेंटर’मध्ये गेली. या वेळी अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला. ‘एका दिवसात १० ते १५ जण तिच्यावर बलात्कार करायचे’, असे पीडित मुलीने सांगितले.
४. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ‘स्पा सेंटर’च्या संचालक झुमा, पूजा, रुबेल आणि सद्दाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.‘स्पा सेंटर’ बंद करून आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकर अटक करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त कला रामचंद्रन यांनी दिले.
संपादकीय भूमिकाअशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !