|
नवी देहली – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अटकेच्या वेळी त्यांच्या घरासह अनेक ठिकाणी धाडीही घालण्यात आल्या. यातून २ पिस्तुले आणि २४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. खान यांना अटक करण्याच्या वेळी त्यांचे नातेवाईक आणि समर्थक यांच्याकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे अधिक पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. मारहाण करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.
रेड के दौरान AAP विधायक अमानतुल्लाह के रिश्तेदारों ने ACP पर किया हमला: FIR के बाद गिरफ्तारी की कार्रवाई, कुल ₹24 लाख और दो अवैध हथियार जब्त#Amanatullahkhan #AAPhttps://t.co/dlNhLP0ZnU
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 17, 2022
१. अमानतुल्ला खान यांच्या जवळचे कौशर इमाम सिद्दिकी यांच्याकडून एक पिस्तूल, काही काडतुसे आणि १२ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली, तर अन्य एक हामिद अली खान यांच्याकडून १ पिस्तूल आणि १२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
२. अमानतुल्ला खान देहली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असतांना ३२ जणांना नियमांचे उल्लंघन करून भरती केले होते, तसेच बोर्डाच्या काही मालमत्ता भाड्यानेही दिल्या होत्या, असा आरोप आहे. तसेच बोर्डाच्या पैशांचा दुरुपयोग केला. यात सरकारने दिलेल्या अनुदानाचाही समावेश आहे.
संपादकीय भूमिका
|