१. ‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’ – श्री. राम ज्ञानीदास महात्यागी (संस्थापक, महात्यागी सेवा संस्थान, श्री तिरखेडी आश्रम), गोंदिया, महाराष्ट्र. (१५.६.२०२२)
२. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘आजच्या काळातही जप-तप करून नकारात्मक ऊर्जा (negative energy) नष्ट होते’, असे वाटते.’ – प.पू. चंद्रकांत महाराज शुक्ल (जिल्हा प्रमुख, गुरुवंदना मंच) बलसाड, गुजरात. (१६.६.२०२२)
सूक्ष्म जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. |