पुणे येथील शास्त्रीय गायिका सौ. अपूर्वा देशपांडे (संगीत अलंकार) यांना शास्त्रीय संगीताविषयी आध्यात्मिक दृष्टीने चिंतन करतांना जाणवलेली विविध सूत्रे !

१. सौ. अपूर्वा देशपांडे यांचा परिचय

‘सौ. अपूर्वा देशपांडे या रसायनशास्त्रात ‘बी.एस्.सी.’ असून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. ‘गुरुकृपा संगीतालया’च्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायनाचे वर्ग घेत आहेत. त्यांना दैवी प्रेरणेने विविध रागांच्या बंदिशी सुचतात. त्यांनी रचलेल्या बंदिशींचे ‘स्वरसंस्कार’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

२. सौ. अपूर्वा देशपांडे यांना संगीतावर चिंतन करतांना संगीतातील काही संज्ञांचा आध्यात्मिक अर्थ सुचणे

सौ. अपूर्वा देशपांडे

सौ. अपूर्वा देशपांडे या संगीतवर्गाच्या वेळेव्यतिरिक्तही संगीतावर मनन आणि चिंतन करतात. त्या वेळी त्यांना संगीतातील काही संज्ञांचा सुचलेला आध्यात्मिक अर्थ, तसेच ‘समाजातील कलाकार अन् साधना करणारा कलाकार’ यांमधील सुचलेला भेद येथे दिला आहे.

२ अ. ‘बंदीश’ (शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत) या संज्ञेचा सुचलेला आध्यात्मिक अर्थ : ‘बंदीश’ या शब्दामध्ये बंद (बद्ध) आणि ईश (ईश्वर) असे दोन शब्द आहेत. जिच्या गायनातून जीव परमात्म्याशी किंवा ईश्वराशी जोडला गेला (बद्ध झाला) आहे, ती बंदीश. सौ. देशपांडे यांना एखाद्या रागाची बंदीश सुचते, तेव्हा नाविन्याच्या आविष्कारातून त्यांना ईश्वराशी अनुसंधान साधता येते.

२ आ. संगीतातील विविध तालांच्या मात्रा आणि त्याचा सुचलेला आध्यात्मिक अर्थ

३. लोकरंजनासाठी कला सादर करणारे समाजातील कलाकार आणि साधना म्हणून कला सादर करणारे साधक कलाकार

– सौ. अपूर्वा देशपांडे (संगीत अलंकार), पुणे (४.१०.२०१९)