५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नाशिक येथील चि. अधिश्री प्रशांत विसपुते (वय १ वर्ष) !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अधिश्री प्रशांत विसपुते ही या पिढीतील एक आहे !

भाद्रपद कृष्ण पंचमी (१५.९.२०२२) या दिवशी चि. अधिश्री प्रशांत विसपुते हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(अधिश्री म्हणजे तेजस्वी आणि उच्च)

चि. अधिश्री विसपुते

चि. अधिश्री प्रशांत विसपुते हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भारपणात नामजप, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे आणि सत्संग ऐकणे : ‘मी गर्भधारणेच्या पहिल्या मासापासूनच प्रतिदिन नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि सत्संग ऐकणे आदी करत होते. त्यामुळे ‘बाळ शांत आहे’, असे मला वाटले. मला गर्भधारणा होऊन ३ मास झाल्यावर कोरोना महामारीचा काळ चालू झाला. त्या वेळी मी सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायचे, ‘तुम्हीच त्याचा सांभाळ करत आहात.’

सौ. दीपाली विसपुते

१ आ. स्तोत्रे वाचणे : त्या कालावधीत मी ‘हरिवंश पुराण’ या ग्रंथाचे पूर्ण वाचन केले. मी प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, बगलामुखी स्तोत्र यांचे वाचन करत होते. त्यामुळे घरातील व्यक्तींना कोरोना झाला असूनही मला काहीही त्रास झाला नाही आणि बाळही सुखरूप होते. ही कृष्णाची माझ्यावर फार मोठी कृपाच होती.

१ इ. ‘सोनोग्राफी’च्या अहवालात बाळाची हालचाल न जाणवणे; मात्र प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकल्यावर बाळाची हालचाल जाणवणे : मला गर्भधारणा होऊन ४ मास झाले. तेव्हा माझी २ – ३ वेळा ‘सोनोग्राफी’ (योग्य निदानासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भाची चित्रे घेण्याची चाचणी) केल्यावर आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘बाळाची हालचाल जाणवत नाही. तुम्ही बाहेर बसा. पुन्हा पाहू.’’ तेव्हा मी बाहेरच्या बाकावर बसून प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) रचित भजन ऐकले. तेव्हा मला बाळाची हालचाल जाणवली. नंतर पुन्हा ‘सोनोग्राफी’ केल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘आता बाळाची हालचाल जाणवत आहे. बाळ व्यवस्थित आहे.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘प.पू. बाबांच्या भजनामुळेच हे सर्व झाले. प.पू. बाबांनीच बाळाचे रक्षण केले.’ माझी प.पू. बाबा आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

१ ई. सातव्या आणि आठव्या मासात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ आणि ‘रासलीला’ या ग्रंथांचे वाचन करतांना बाळ ‘ग्रंथ वाचन ऐकत आहे’, असे सतत जाणवायचे.

श्री. प्रशांत विसपुते

२. जन्मानंतर

२ अ. बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा होत्या.

२ आ. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सत्संगाची ओढ

१. मी माहेरी, म्हणजे नंदुरबार येथे गेले होते. तेव्हा अधिश्री प्रतिदिन सकाळी झोपून रहायची; मात्र तिला ‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांना (सद्गुरु बाबांना) भेटायला जायचे आहे’, असे सांगितल्यावर ती पहाटे ४ वाजल्यापासून जागी असायची.

२. सद्गुरु जाधवकाकांना ‘अधिश्री’ हे नाव आवडले. त्यांनी ३ वेळा ‘अधिश्री’ असे उच्चारून जणू तिचे नामकरण केले. सद्गुरु जाधवकाकांना भेटल्यावर ती त्यांच्या मांडीवर पुष्कळ खेळली. अधिश्री सद्गुरु जाधवकाकांशी पूर्वीपासूनच ओळख असल्यासारखी त्यांना पहात होती.

२ इ. सात्त्विकतेची आवड

१. तिला देवाचे भजन करायला पुष्कळ आवडते आणि त्या वेळी ती हाताने टाळ्या वाजवते.

२. तिला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करायला आवडते. ती त्यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर हसते.

३. एकदा तिच्यासमोर २ – ३ खेळणी आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला होता. त्या वेळी तिने ती खेळणी न घेता ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन पहात बसली. तेव्हा ती पुष्कळ आनंदात होती.

३. स्वभावदोष : हट्टीपणा.’

– सौ. दीपाली विसपुते (कु. अधिश्रीची आई), भैरवनाथ नगर, नाशिक. (१०.८.२०२२)