रोहिंग्या निर्वासितांमुळे बांगलादेशच्या सुरक्षा आणि स्थिरता यांवर परिणाम ! – शेख हसीना

उजवीकडे शेख हसीना

ढाका – बांगलादेशमध्ये १० लाख रोहिंग्या निर्वासितांच्या दीर्घकाळ उपस्थितीमुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक आणि राजकीय स्थिरता यांवर वाईट परिणाम होत आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतेच येथे केले. बांगलादेश आणि अमेरिका यांनी आयोजित केलेल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील २४ देशांच्या सैन्याधिकार्‍यांच्या तीन दिवसीय बैठकीत शेख हसीना बोलत होत्या. ‘रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्‍न सोडवण्यावर बांगलादेशचा भर राहील’, असे त्या पुढे म्हणाल्या. (देशाच्या सुरक्षेला सर्वोत्तम प्राधान्य देणार्‍या शेख हसीना यांच्याकडून भारतीय राज्यकर्ते  बोध घेतील का ? – संपादक)

बांगलादेशच्या सैन्याचे जनरल एस्.एम्. शफीउद्दीन यांनी सांगितले की, या परिषदेत सहभागी झालेल्या अमेरिका, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांतील अधिकार्‍यांना रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये नेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली जाईल.